मर्ढेकरांची खूप खूप आवडलेली शाळेतली कविता :
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळुनी दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा !
डोकी अलगद घरे उचलती , काळोखाच्या उशीवरूनी ,
पिवळे हंडे भरुनी गवळी , कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचिती
गंजदार पांढऱ्या नि काळ्या, मिरवित रंगा अन नारिंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी.
कुठे धुराचा जळका परिमल , गरम चहाचा पत्ती गंध ,
कुठे डांबरी रस्त्यावरच्या , भुऱ्या शांततेचा निशिगंध ..
या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा,
अजस्र धांदल , क्षणात देईल, जिवंततेचे अर्घ्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनाचा वास कोवळा
सचेतनाचा हुरूप शीतल , उरे घोटभर गोड हिवाळा !
-बा. सी. मर्ढेकर

No comments:
Post a Comment